नागपूर : कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत धर्म नगर येथे किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.प्रेम धनेश निशाद (वय 21, रा विजयनगर) असे या हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तर भूपेंद्र बघमरिया (वय 18 वर्ष रा धर्म नगर ) असे आरोपीचे नाव आहे. शहरात श्री गणेश विसर्जन होत असल्याने पोलिस यंत्रणा व्यस्त आहे. अशात ही घटना मध्यरात्री घडली, या घटनेनंतर जखमी युवक प्रेम धनेश निशादला मेयो शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















