श्रीमती सुवर्णा मानकर यांना महिला शक्ती शिरोमणी अवार्ड

0

नागपूर : श्रीमती सुवर्णा मानेकर यांना’ नारी शक्ती शिरोमणी अवार्ड 2023′ ने सन्मानित करण्यात आले. इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ विद्यापीठाच्या कृष्ण मेनन भवन दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात गृह मंत्रालयाचे सहाय्यक संचालक डॉ मोहन चंद्र, कॅनडा दूतावासाच्या प्रतिनिधी इस्टेली श्रेयक्स तसेच मिसेस इंडिया डेजी, श्रीमती अनुला मोर्चा, माजी कुलपती जगद्गुरु रामानंदाचार्य संस्थान संस्कृत विश्वविद्यालय जयपुर, राजस्थान यांच्या हस्ते सुवर्णा मानेकर यांना’ सन्मानित करण्यात आले. यावेळी नेपाळ सरकारचे प्रथम उपराष्ट्रपती न्यायमूर्ती परमानंद झा यांचे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अतिथीनि त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. श्रीमती सुवर्णा मानेकर या जय दुर्गा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत सचिव आणि इंटरनॅशनल नेचरोपथी ऑर्गनायझेशन (आयएनओ) विदर्भ उपाध्यक्ष आहेत. हरियाणा, पंजाब,नवी दिल्ली,मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, मेघालय, बिहार, कर्नाटक येथील एकंदर 85 महिलांचा पुरस्कार देत यावेळी सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय समरसता मंच आणि इंडो नेपाळ समरसता ऑर्गनायझेशनच्या संयुक्त विद्यमाने या महिला शक्ती शिरोमणी अवार्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.