श्री विठ्ठल दर्शनासाठी पैसे, रॅकेट आले समोर

0
  1. पंढरपूर : श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या हैद्राबादमधील तीन भाविक दर्शनास आल्यानंतर त्यांना गाठून एजंट शांतनू उत्पात, सागर बडवे यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयाची मागणी केली. पैसे घेऊन दर्शनास सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना मंदिर समिती पोलीस कर्मचारी यांनी पकडले. दरम्यान,मंदिरात दर्शनास त्यांना सोडत असताना पोलिसांनी चौकशी केली असता. याबाबतचा सर्व गैरप्रकार उघडकीस आला. सदर एजंटची चौकशी सुरू असून चौकशी नंतर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.