monsoon session of legislature शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधानसभेत सभात्याग

0

मुंबई Mumbai – राज्यातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी Legislative Monsoon Session विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरु झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला परवानगी नाकारल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला. काँग्रेसचे गटनेते Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना देत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर President Rahul Narvekar यांनी ती फेटाळल्याने घोषणाबाजी करीत विरोधकांनी सभात्याग केला.Opposition aggressive on the issue of farmers, walkout in the Legislative Assembly 

तथापि, या मुद्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणार असून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. बोगस बियाण्यांचा प्रतिबंध घालण्यासाठी सरकार कायदा करणार असल्याचे त्यांनी सांगिले.

अधिवेशनाची सुरवात

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन गट सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अधिवेशनाला सुरुवात झाली. वंदे मातरम ने कामकाजाला सुरुवात झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करवून दिला. यावेळी विरोधकांच्या बाकांवरून टिकाटिप्पणी सुरु होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी कामाला सुरूवात केली असून या अधिवेशनात ते लक्ष्य ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे महाविकास आघाडीची बाजू कमकुवत झाल्याने अधिवेशनावर सत्ताधाऱ्यांचा वचरष्मा राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.