मुंबई सागरी सेतूला सावरकरांचं नाव

0

 

मुंबई : Versova- Bandra Sea Bridge वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर (SwatantraVeer Savarkar) यांचं नाव देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet Meeting) हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी करणारे पत्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी devendra fadnavis eknath shinde  वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकरांचं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली.