नागपूर : प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलेल्या दोन मित्रांमध्ये कमिशनच्या पैशावरून वितूष्ट आले आणि या वादात ते पक्की वैरी झाले. एकाचा खून झाला. ही घटना अग्रसेन चौकात घडली. मृतकाचे नाव परवेज शेख व. पापा मिया शेख वय 30 वर्ष, रा. खरबी असे असून प्रॉपर्टी डीलर आरोपी परवेज याकुब खान वय 28 वर्ष,रा. पारडी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी परवेज खान व परवेज शेख या दोघांची बरेच दिवसापासून प्रॉपर्टी डिलिंग व्यवसाय करीत असल्याने चांगली मैत्री होती. परस्पर ओळखीचे असले तरी पैशासाठी त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. मृतकाला पैसे देण्याचे आमिष देत आरोपीने अग्रसेन चौकात बोलावले व तो येताच संधीच्या शोधात असलेल्या आरोपी परवेज व त्याच्या चार सहकाऱ्यांनी त्याची गळा चिरून, सपासप शस्त्रांचे घाव घालून हत्या केली. परवेजच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तहसील पोलिसांनी पाच लोकांना तातडीने ताब्यात घेतले व भांदवि कलम 302 ,143,147, 148 149 या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.