निधी वाटपाच्या बाबतीत या सरकारवर कोणताही आरोप नाही – आ आशिष जयस्वाल

0

 

 

नागपूर – निधी वाटपाच्या बाबतीत या सरकारवर आमचा कुठलाही आरोप नाही. या सरकारमध्ये इतिहासात कधी मिळाला नाही, इतका निधी माझ्या मतदारसंघाला मिळाला असल्याचा दावा आमदार ऍड आशिष जैस्वाल यांनी केला.

जैस्वाल माध्यमांशी विमानतळावर बोलताना म्हणाले, या सरकारमध्ये परिपक्व आणि अभ्यासू नेते नेतृत्व करतात. त्यामुळे काही अडचणी नाहीत. महायुतीचे तिन्ही नेते सक्षम आहेत. परस्पर कॉर्डिनेशन चांगले आहे. त्यामुळे निधी वाटपाची काही अडचण नाही. माझे अजित पवारांसोबत जुने संबंध आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचा पक्ष वाढविण्याचा हक्क आहे, किंबहुना ते त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही आपल्या मतदारसंघात रमलो आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही मला माहित नाही. मी फक्त आमदार असूनही राज्यातील अनेक धोरणांवर काम करून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. मी समाधानी आहे. माझ्या अभ्यासाचा वापर करून पुरेपूर संधी दिली जात असल्याने मी आनंदी आहे.