– अमृतकाल – व्हिज्युअलायझिंग इंडिया @100 फिनलिटटेक परिषदेला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद
नागपूर NAGPUR , 20 जानेवारी : भारताला अमृतकाळामध्ये नेण्यासाठी पुढील १५ वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन डीसीएम देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी केला. ते अमृतकाल – व्हिज्युअलायझिंग इंडिया @100: सेंट्रल इंडियाज प्रीमियर इन्व्हेस्टर एज्युकेशन इनिशिएटिव्ह अंतर्गत हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ फिनलिटटेक परिषदेत बोलत होते. गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख ट्रेंड आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे शोध व भारताची आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे वाटचाल यावर बोलले. याप्रसंगी मंचावर आशुतोष वखरे, शिवानी दाणी-वखरे, अभिमन्यू तुलसीयान, एस.पी. तुलसीयान आणि विजय केडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एआय अल्गोरिदम लाँच केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताच्या विकासाची दृष्टी स्पष्ट केली आणि त्यांचा पुढील पाच वर्षात भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प देखील सांगितला. त्यांनी महाराष्ट्रातील गडचिरोलीचे उदाहरण देताना सांगितले की, पूर्वी गडचिरोली हे नक्षलवादी भाग म्हणून ओळख होती पण आता लवकरच ते पोलादी शहर म्हणून ओळखले जाईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकारची गुंतवणूक जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शिवानी दाणी वखरे यांचे कौतुक आणि आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, आपल्याला आपल्या देशातील उद्योग आणि शेती पुढे न्यायची आहे आणि गुंतवणुकीशिवाय आपला विकास कठीण आहे.
प्रारंभी मनी बी इन्स्टिट्यूटच्या संचालिका शिवानी दाणी वखारे यांनी परिषदेमागील उद्देश आणि भूमिका स्पष्ट केली आणि मनीबी इन्स्टिट्यूटच्या प्रवासाविषयी माहिती दिली. तिने सांगितले की, मनीबी गेल्या ८ वर्षांपासून बीएसई, एनएसई, म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी गुंतवणूक जागृती करत आहे. मनी बी ही सेबी नोंदणीकृत प्रशिक्षण संस्था आहे. अर्चित चांडक, आयपीएस अधिकारी यांनी ऑनलाइन फसवणुकीबद्दल लोकांना जागृत केले. तर नागपूर नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अनुज बडजाते यांनी शेअर बाजारातील व्यवहाराबाबत आपले विचार मांडले आणि सांगितले की, दैनंदिन व्यवहार ही ट्रेडिंग मार्केटची पहिली पायरी असू नये.
पहिल्या सत्रात स्टॉक मार्केट एक्सपर्ट एस. पी. तुल्सियन सर यांनी पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स असावेत आणि कुठे गुंतवणूक करावी हे सांगितले. त्यांनी 3 समभाग देखील सुचवले 1. GMR इन्फ्रा, 2. अदानी इंटरनॅशनल आणि 3. सुझलॉन एनर्जी आहेत. सोबतच गिरीश व्यास सर म्हणाले की, गुंतवणूक करताना अखेरपर्यंत लक्ष ठेवणे फायदेशीर असते.
दुसऱ्या सत्रात विजय केडिया इन्व्हेस्टर आणि मोटिव्हेशनल स्पीकर यांनी त्यांचे अनुभव कवितेच्या रूपात लिहून गुंतवणुकीच्या जागृतीवर सर्वांना सांगितले की, नवीन गुंतवणूकदारांनी थेट व्यापार न करता म्युच्युअल फंड गुंतवणूक किंवा एसआयपीने सुरुवात करावी आणि नंतर ते म्हणाले की, शेअर बाजार हा पैसे कमविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, पण सर्वात कठीण मार्गाने सर्वोत्कृष्ट देखील आहे. प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांची गुंतवणूक साधने आणि पद्धती यांविषयी त्यांचे ज्ञानवर्धन केले. संमेलनाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि सर्व वयोगटातील लोक परिषदेला उपस्थित होते.