वो…काsssट…! पतंगांनी व्यापले आसमंत

0

पतंगशौकिनांच्या आनंदाला उधाण


नागपूर. संक्रांतीचे पर्व (Makar Sankrant ) सर्वत्र जल्लोषात साजरे केले जात आहे. पतंगशौकीनांच्या आनंदाला उघाण आले आहे. आसमंत रंगीबेरंगी पतंगांनी व्यापले (Colorful kites filled the sky ) असून सर्वत्र वो…काsssट…च्या आरोळ्या घुमत आहे. यंदा सुटीच्या दिवशी संक्रात असल्याने साऱ्यांचाच आनंद द्विगुणीत झाल्याचे जाणवत आहे. आकाशातील पतंगांची गर्दीही अधिक दिसून येत आहे. उपराजधानीतील प्रत्येक भागात आशाशातील पतंगांच्या गर्दीचे दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. प्रत्येक गच्चीवर सकाळपासूनच अख्खे कुटुंब एकत्रित पतंग उडवण्याचा आनंद घेत (Family enjoying kite flying together ) आहे. महिला, युवतीही पतंग उडविण्याची हौस भागविताना दिसत आहे. मध्यनागपुरात तर आकाशात पतंग दाटीने उडत असल्याचे दिसत आहे. युवकांमध्ये जल्लोषाला अगदी भरते आले आहे. पतंग उडवितानाच डीचेच्या तालावर डिजेच्या तालावर नृत्याचाही आनंद घेत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.


यंदाची संक्रांत सुटीच्या दिवशी असल्याने साऱ्यांच्याच आनंदाला भरते आले आहे. साऱ्यांनीच पतंग आणि मांज्याची आधिपासूनच जुळवाजुळव करून ठेवली होती. शनिवारी जुनी शुक्रवारीसह शहरातील सर्वाच बाजारपेठांमधील पतंग व मांजाच्या दुकानांमध्ये गर्दी झालेली दिसली. जुनी शुक्रवारी येथील बाजारात तर पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले. आज सकाळपासूनच आकाशात पतंगांची गर्दी झाली होती. अबालवृद्ध सारेच पतंग उडविण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.


नायलॉन मांजाचा सर्रास वापर


प्रतिबंधित नायलॉन मांजाला सर्वच स्तरातून विरोध झाला. शाळकरी मुलांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथही घेतली. प्रशासनानेही आवश्यक खबरदारी घेतल्याचा दावा केला. आज मात्र स्थिती काही वेगळीच दिसली. पोलिसांनी अगदी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार असल्याचेही सांगितले होते. पण, या साऱ्याचा काडीचाही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. नायलॉन मांजाचा सर्रास वापर करण्यात आला. अगदी बिनधास्तपणे शहराच्या सर्वच भागात नायलॉन मांजानेच पतंग उडविल्या जात असल्याचे दिसले. आनंदाच्या या पर्वावर अप्रिय घटना नको म्हणून अनेक सजग नागरिकांनी मांजा दिसेल तिथे थांबून तो वेगळा करण्यावर भर दिल्याचेही दिसले.


उड्डाणपूल बंद


नायलॉन मांजाचा सर्वाधिक धोका दुचाकीचालकांना होतो. त्यातही उड्डाणपुलांवर सर्वाधिक भीती असते. ही बाब लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील उड्डाणपूल आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांना काहीसा त्रास सहन करीत मार्गक्रमन करावे लागत आहे. पण, खबरदारीम्हणूनच ही उपाययोजना असल्याने कुणीही कुरबूर करताना दिसले नाही.

मेडिकल, मेयो अलर्टवर


मांजामुळे जखमी होणाऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी मेडिकल, मेयोत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अकस्मातविभाग, अस्थिव्यंग आणि सर्जरी विभागला अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागचे प्रमुख व अधिनस्थ डॉक्टरांनाही तत्परतेने उपाचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.