जनआक्रोशतर्फे 10 मे रोजी आयोजन
नागपूर, 7 मे 2023
जनआक्रोश – फॉर बेटर टुमारोच्यावतीने विशेष सरकारी वकील पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांचे ‘रस्ते सुरक्षा’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बुधवार, 10 मे 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉल, उत्तर अंबाझरी मार्ग येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड व सचिव रविंद्र कासखेडीकर यांनी केले आहे. जनआक्रोश – फॉर बेटर टुमारो ही सामाजिक संस्था 11 वर्षांपासून रस्ते अपघात व त्यात होणारे मृत्यू यांची संख्या कमी करण्यासंदर्भात समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. महाराष्ट्रासह उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा, ओरिसा व बंगलोर येथे संस्थेची कार्यालये आहेत.