नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात ; 3 हजारांची लाच स्वीकारताना अटक 

0

 

 

वर्धा- शेतीचे हिस्सेवाटणी प्रकरण मार्गी लावण्यासाठी तीन हजारांची लाच घेतांना नायब तहसीलदाराला अटक रकरण्यात आली. ही कारवाई देवळी येथील तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली. किशोर शेंडे (वय 51) रा. वर्धा असे अटक केलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एक गृहस्थ आपसी हिस्सेवाटनीचे प्रकरण घेऊन देवळी येथील तहसील कार्यालयात गेले होते. परंतु वेळोवेळो त्रुटी काढून प्रकरण प्रलंबित ठेवले. वेळखाऊ धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाला. मध्यस्थी मार्ग म्हणून शेतकऱ्याला नायब तहसीलदार किशोर शेंडे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. शासकीय कामासाठी लाच मागत असल्याने त्यांनी या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांना दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाने सापळा रचण्यात आला. अखेर तहसीलदाराची भेट घेऊन प्रकरण मार्गी लावण्यासाठी तीन हजार रुपये देण्याचे ठरले. नियोजनाप्रमाने शेतकरी नायब तहसीलदार यांना पैसे घेतांना तहसील कार्यालयात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलिस निरीक्षक संतोष मुपडे, संतोष बावनकुळे, कैलास वालदे, प्रितम इंगळे, निलेश महाजन, प्रशांत मानमोडे यांनी केली.

 

BYTE – अभय आष्टेकर, लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक