राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची अपात्रता रद्द

0

नवी दिल्लीः राष्ट्रवादीचे नेते आणि लक्षद्विपचे खासदार मोहम्मद फैजल यांची लोकसभेतील अपात्रता रद्द करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP MP Mohamad Faizal) मोठा दिलासा मिळाला आहे. १३ जानेवारीला स्थानिक न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाल होते. २५ जानेवारीला उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. या दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूकही जाहीर केली होती. फैजल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने आयोगाला फटकार लगावली होती. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात राजकारण तापले असतानाच आता फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल झाली आहे.
हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी खासदार फैजल यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर फैजल यांना अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. लोकसभेच्या सचिवालयाने १३ जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्यात दोषी ठरवल्याच्या तारखेपासून (११ जानेवारी २०२३) फैजलला यांना लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्यात आले होते. याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वीच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेचा आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल झाली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा