मुंबई: विधान परिषदेत ज्यांच्याकडे संख्याबळ, त्यांचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचा दावा अजित पवारांनी केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस या पदावर दावा सांगणार असल्याचे अंदाज खरे ठरले आहेत. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे.ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाकडे असणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद संकटात सापडले आहे. केवळ अजित पवारच नाहीत तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनीही “आम्ही 100 टक्के विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहोत” असे वक्तव्य केलं आहे. यामुळे आता अंबादास दानवे यांचे पद जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
ठाकरे गटाचे आमदार आमदार विप्लव बाजोरिया यांनी 2022 मध्येच ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला होता. काल मनिषा कांयदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे.