Devendra Fadnavis बजरंग दलावर बंदी घालणे कोणालाही शक्य नाही-फडणवीस

0

बेळगाव (BELGAW)  : कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता नाही. मात्र, ती आली तरी (BAJRANG DAL) बजरंग दलावर बंदी घालणे कोणालाही शक्य नाही, असे स्पष्ट मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. (Devendra Fadnavis in Karnataka) प्रभू श्रीराम आणि बजरंग बली यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवून द्या आणि विकासासाठी भाजपला एकहाती सत्ता द्या, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले. देवेंद्र फडणवीस हे सध्या (KRNATAK) कर्नाटकातील बेळगावच्या दौऱ्यावर असून तेथे ते भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारात आहेत.

बेळगाव येथे आयोजित जाहीरसभेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे देशात आणि कर्नाटकात विकासाचा आलेख उंचावला असल्याचे मत व्यक्त करून फडणवीस म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरुन पाचव्या स्थानी पोहोचली आहे. घरकुल योजना, शौचालये, शुद्ध पाणी, वीजजोडण्या दिल्या आहेत. देशाचे बजेट ४८ लाख कोटींवर पोचविले आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणून कुरापती करणाऱ्यांना सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून धडा शिकविला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. कर्नाटकने एच. डी. कुमारस्वामी, सिध्दरामय्या यांचे सर्कस सरकार पाहिले आहे. त्यामुळे आता काँग्रेस सत्तेवर येणार नाही. मात्र, सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, एम. बी. पाटील आणि खर्गे हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे काँग्रेसची सत्ता आल्यास ती अस्थिर असेल, असेही फडणवीस म्हणाले.