Home Top News संघाला कोणीच परकं नाही! डॉ. मोहन भागवत

संघाला कोणीच परकं नाही! डॉ. मोहन भागवत

0

लखनौ  Lucknow – “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपूर्ण समाजाला एकजूट करायचे आहे. या प्रक्रियेत संघासाठी कोणीही परके नाहीत. जे आमचा विरोध करतात, ते देखील आमचेच आहेत. त्यांच्या विरोधानं आमचे नुकसान होणार नाही, इतकीच आम्ही काळजी घेणार आहोत”, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Dr Mohan Bhagwat) यांनी लखनौ येथे बोलताना मांडली आहे.

लखनौच्या चार दिवसाच्या दौऱ्यावर असलेले सरसंघचालक भागवत यांनी सोमवारी विचारवंतांशी संवाद साधला. या दरम्यान बोलताना भागवत म्हणाले की, संघाच्या स्वयंसेवकांनी विरोधकांची यादी तयार करुन त्यांच्याशीही संपर्क करावा. संघविरोधी असलेल्या लोकांनाही सोबत जोडण्याचे आमचे प्रयत्न राहतील. सपा, बसपा, काँग्रेसचे विचार असलेल्या लोकांनाही संघ सोबत घेऊन चालणार आहे. समाजातील सर्व प्रबुद्ध लोकांना सोबत घेऊन संघ वाटचाल करणार आहे. समाजिक बदलांसाठी संघाचे स्वयंसेवक समाजात अनेक चांगले उपक्रमक राबवित आहेत, असेही भागवत म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे देशाचा उद्धार झाल्याचं आम्हाला इतिहासात नमूद करायचं नाही. या देशात एक उत्तम पीढी संघाला घडवायची आहे. देशाला जगाचा गुरू करायचे आहे, असेही ते म्हणाले.