Home Top News जम्मू- काश्मिरात आता 370 परत आणणे अशक्य- पंतप्रधान

जम्मू- काश्मिरात आता 370 परत आणणे अशक्य- पंतप्रधान

0

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : जगातील कुठलीही शक्ती जम्मू-काश्मिरात कलम 370 परत आणू शकत नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की, जम्मू-काश्मिरातून कलम 370 रद्द करण्यासाठी देशात प्रदीर्घ संघर्ष झाला होता. त्यानंतर सरकारने राज्यातून हे कलम रद्द केले. सरकारच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेय. आता विश्वातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणू शकत नसल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा सकारात्मक वापर करू असे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी मोदींनी संसदेतील घुसखोरीची घटना चिंताजनक असल्याचे म्हटले आणि त्याच्या तळापर्यंत तपास करण्याचेही म्हटले आहे. संसदेत घडलेल्या घटनेचे गांभीर्य अजिबात कमी लेखू नये, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी पूर्ण गांभीर्याने आवश्यक ती पावले उचलली आहेत. तपास यंत्रणा काटेकोरपणे तपास करत आहे. यामागे कोणते घटक आणि हेतू आहेत, याच्या खोलात जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असेही मोदी यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी संसदेतील सुरक्षेचा भंगांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. संसद परिसरात झालेली घटना चिंताजनक आहे आणि याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. तपास यंत्रणा या घटनेचे गंभीरतेने चौकशी करत आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अशा विषयांवर प्रत्येकाने वादविवाद किंवा विरोध टाळावा असे आवाहन मोदींनी केले. गेल्या 13 डिसेंबर रोजी संसदेत काही लोक घुसल्याचा प्रकार समोर आला होता. व्हिजीटर पास घेऊन आतमध्ये आलेले हे दोघे गॅलरीतून उड्या मारून सभागृहात उतरले , यानंतर त्यांनी बुटांमध्ये लपवलेल्या स्मोक गॅस सभागृहात धूर केला. हे तरूण एकजण लखनऊ येथील सागर शर्मा आणि दुसरा मैसूर येथील मनोरंजन डी असल्याची माहिती समोर आली. दोघांना भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारसीनंतर पास मिळाले होते. जेव्हा सभागृहात हे होत असताना तेव्हाच संसदेबाहेर त्यांच्या साथिदारांनी देखील गदारोळ केला. नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी संसदेबाहेप स्मॉक गॅस सोडला आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी या दोघांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले.