आता शिवसेनेवर खासगी मालमत्ता म्हणून कुणीही अधिकार सांगणार नाही-फडणवीस

0

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेहण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे कुणीही शिवसेनेवर खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात या निर्णयावर (DCM Devendra Fadnavis on ECI Decision on Shiv Sena & Symbol) बोलताना दिली.

फडणवीस म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे, तीच खरी शिवसेना ठरणार आहे. हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. आज निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केलेय. आम्हाला याचा विश्वास होता. याचं कारण, यापूर्वीच्या सर्व निर्णायमध्ये निवडणूक आयोगानं पक्षातील फुटीवर असेच निर्णय दिले आहेत. आमदार आणि खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेला आहे. कारण, एखादा पक्ष मतदारांच्या आधारावर असतो, तो आमदार खासदारांवर असतो, असेही फडणवीस म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा