अमरावती- मी माझ्या पक्षाचं नाव दुसऱ्या कोणाला देणार नाही. हल्ली लोक पक्ष चोरु लागले आहे. खरेतर हा जाहीर सभेचा सिझन नाही, सभेसाठी मी फिरत नाही, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी फिरतो आहे. सर्व कार्यकर्त्यांना मातोश्री वर भेटणे शक्य नाही अशी भावनिक साद माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना घातली.
ठाकरे पत्रपरिषदेत म्हणाले, या आव्हानात्मक कार्यकाळात कट्टर शिवसेना कार्यकर्त्यांना मी भेटतो आहे. आधी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळविला जात आहे.पक्षाचे नाव निवडणूक आयोग देऊ शकत नाही, ते माझ्यासोबत राहील, तो त्यांचा अधिकार नाही. मी रुग्णालयात असताना रात्री हालचाली, गाठीभेटी चालल्या होत्या, त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे याकडे लक्ष वेधले. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे. पूर्वी सरकार मतपेटी मधून सत्तेत यायचे, आता खोक्यातून येत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा मी सुद्धा ऐकतोय. आणीबाणी नंतर प्रचाराची मुभा दिली होती. आता ती नाही. दरम्यान अद्याप प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव आला नाही. असे प्रस्ताव घाई घाईत येत नाहीत असेही ठाकरे एका प्रश्नाचे उत्तरात म्हणाले.