Home Vidarbha OBC warriors: ओबीसी योद्धा रविंन्द्र टोंगे यांचा सत्कार

OBC warriors: ओबीसी योद्धा रविंन्द्र टोंगे यांचा सत्कार

0

चंद्रपूर (Chandrapur): ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू व्हावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रविंन्द्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर 2023 ला ओबीसीच्या मागण्यासाठी 21 दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते.

त्यांच्या प्रयत्नामुळे ओबीसी वसतीगृह सुरू झाले आहे. त्यामुळे टोंगे यांचा जयदीप रोडे यांच्याकडून शाल देऊन सत्कार करण्यात आला.

आणि वसतिगृहात कोणकोणत्या सोई सुविधा आहे यांची सहाय्यक आयुक्त यांचे कडून माहिती घेण्यात आली आणि वासतिगृहातील विधार्थी यांच्या सोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या,यावेळी सहायक आयुक्त आशा कवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, सतीश भिवगडे, सुधाकर काकडे, रणजित डवरे, महिला महासंघाच्या जिल्हा महासचिव मनीषा बोबडे, वैभव सिरसागर,प्रशांत पिंपळशेंडे,प्रशांत गौरकार, नंदू लभाने सोबतच इतर मागास बहुजन कल्याण विभागातील विध्यार्थी उपस्थित होते.