आम आदमी पार्टीच्या वतीने नागपूर मनपा समोर मटका फोड आंदोलन

0

 

नागपूर : आम आदमी पार्टीच्या वतीने नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मटका फोड आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या बिनाकी मंगळवारी, कांजी हाऊस चौक, याभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, दोन-तीन दिवसा आड पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या तक्रारीची कोणीही दखल घेत नसल्याने महापालिकेविरुद्ध हे मटकाफोड आंदोलन करण्यात आले, असल्याचे आंदोलकांनी सांगितले. किमान तासभर तरी दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा