नागपूर : मराठा आरक्षणाला शरद पवार (NCP Leader sharad Pawar) यांचाच विरोध होता. त्यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. परंतु, त्यांना कधीच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते व दोन समाजांना केवळ झुंजवत ठेवायचे होते, असे परखड मत उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Maratha Reservation Issue) यांनी व्यक्त केले आहे.
नेतेपदासाठी शरद पवारांनी दोन समाजाला झुंझवत ठेवल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळणार मात्र ओबीसींवर अन्याय होणार नाही. महाराष्ट्रात ज्यावेळी आपले सरकर होते, त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळत टिकवेले गेले होते. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही, हे भाजपचे आश्वासन असल्याचे फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता नाही. ते रोज भूमिका बदलतात. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवण्याची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा आनंद आहे. मात्र येणाऱ्या लोकसभा निवणुकीचे अव्हान आपल्यासमोर आहे. प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणून घ्यायची असते. ५ राज्यांची लोकसभा निवडणूल लोकसभेची तयारी म्हटली जात होती. देशाची सूत्र पुन्हा मोदींच्याच हातात द्यायचे लोकांनी ठरविले आहे. देशातील समान्य माणसाच्या मनात खात्री आहे की या देशाला फक्त नरेंद्र मोदी विकसीत करु शकतात. मोदींच नाव आहे म्हणून अतिआत्मविश्वात राहू नका. अशा भावनेत गेला तर मोदी जी मेहनत करतात, त्याला साजेसे आपले काम होणार नाही. पुढचे ९ ते १० महिने पक्षासाठी द्यावे लागतील. दोन्ही निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढतील. कुणाला किती जागा मिळतील. याची काळजी करु नका. तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत. त्यापेक्षा कमी मिळणार नाही. ज्या जागा आपण लढत नाही, तिथे जो निवडून येईल तो देखील मोदींना पाठिंबा देईल, असे फडणवीस म्हणाले.















