AJIT PAWAR जनमानसातली प्रतिमा मलीन करण्याचे प्रकार वाढले – अजित पवार

0

 

मुंबई MUMBAI : जाणीवपुर्वक काहींना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकांच्या मनात पक्षाविषयी आणि नेत्यांविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हा सुरु आहे.जनमानसातली प्रतिमा मलीन करण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. sharad pawar

संभाजीनगरला औरंगाबादच बोलणार असे शरद पवार म्हणाले अशी चुकीची बातमी पसरवण्यात आली. जाणीव पुर्वक बदनामी केली जात आहे. शरद पवारांना जी धमकी आली त्याबद्दल आम्ही माहीती घेतली. सौरभ पिंपळकर असे ट्विटर वरुन ज्याने धमकी दिली त्याचे नाव आहे. तो भाजपाचा कार्यकर्ता आहे असे कळले पण ते खरं आहे का आम्हाला माहीत नाही.त्याच्या पक्षात असे सांगितले जाते का? मुळात कारण नसताना राजकिय नेत्यांबद्दल असं लिहिणे वैचारिकता आहे का? आता पोलिसांनी सौरभ पिंपळकर याचा कोण मास्टर माईड आहे हे शोधले पाहिजे. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवण्याकरिता प्रयत्न करावा. परंतु इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांची बदनामी करायची गरज नाही. हल्ली जनमानसातली प्रतिमा मलीन करायची हे प्रकार वाढलेले आहेत. पोलिस खात्यातील कायदा सुव्यवस्था बिघडु नये यासाठी सरकारने लक्ष दिले पाहिजे. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले पण असे कधी झाले नाही.असचं चालू राहीलं तर महाराष्ट्राला बदनाम करणारी बाब आहे. मीरा रोड ला विकृतीचा प्रकार घडला. राज्य सरकारने यावर ठोस कायदा करावा अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली.