लोकांना आवडतात ते चित्रपट लोक पाहतात- सुधीर मुनगंटीवार

0

गोंदिया : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विट केल आहे. , ,“दुर्दैव महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. मात्र, या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झाला. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”,या संदर्भात बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की केदार शिंदे यांची ही भावना आहे .मात्र, लोकांनी कोणता चित्रपट पाहावा यासाठी आपण लोकांसाठी कायदा तयार करू शकत नाही की त्यांनी चित्रपट पाहावा ज्यांना आवडते ते चित्रपट पाहतात अशी भूमिका घेतली.