नागपूर -नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने गोकुळपेठ मार्केट आणि खामला मार्केट येथे प्लास्टिक प्रदुषण हटाव या थीमवर जनजागृती मोहीम राबवून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
मोहिमेदरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सदस्यांनी धरमपेठ झोन आणि लक्ष्मीनगर झोनच्या टीमसह नागरिक, दुकानदार, रस्त्यावरील विक्रेत्यांशी संवाद साधला आणि सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर, वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा अवलंब, हिरव्या जीवन पद्धतींचा अवलंब करण्याची निवड आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयी संवाद साधला. विविध पोस्टर्स आणि प्लॅकाईसद्वारे देखील संदेश देण्यात आला.यावेळी एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला टप्प्याटप्प्याने बंद करणे आणि जीवनशैली आणि सवयीमध्ये बदलासह शाश्वत पर्यायाचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला. याप्रसंगी
ग्रीन व्हिजिलच्या टीम लीड सुरभि जैस्वाल म्हणाल्या, आमच्या मोहिमेचा उद्देश सामान्य माणसांपर्यंत पोहोचणे आहे. आपण सिंगल यूज प्लॅस्टिक का वापरू नये आणि संभाव्य पर्याय सुचवावेत. नॉन बायोडिग्रेडेबल आहे, त्यामुळे वर्षानुवर्षे निसर्गात राहते, ५० मायक्रॉनपेक्षा कमी क्षमतेच्या प्लास्टिक कॅरीबॅग्समुळे आपल्या मलनिस्सारण व्यवस्था गुदमरत आहेत, नद्या आणि महासागर मायक्रोप्लास्टिकच्या मोठ्या साठ्याने प्रदूषित झाले आहेत, प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये अन्नाचा कचरा टाकल्याने गाईचे मृत्यू होत आहेत. गुरांना प्लॅस्टिक बंदीमुळे हरितगृह वायू उत्सर्जन 25% कमी होऊ शकते. तथापि, एकेरी वापराचे प्लास्टिक दूर करण्यासाठी, आपल्याला समान खर्चात एकेरी वापराच्या प्लास्टिकला शाश्वत पर्याय आणण्याची गरज आहे.
मोहिमेदरम्यान प प्रकाश वर्दे, उपायुक्त किरण बागडे, सहाय्यक डॉ. आयुक्त, दीनदयाल टेंबरकर, मंडळ अधिकारी, गणेद्र महल्ले डेप्युटी कमिशनर,जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी,कौस्तुभ चॅटर्जी, सुरभि जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, भिष्णुदेव यादव, त्रिया जोगी, प्रिया यादव, पार्थ जुमडे, तृप्ती बांगडकर एनडीएस टीम आणि धरमपेठ, धंतोली झोनचे कर्मचारी आदींनी मोहीम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.