“भारतात राजकारण करणे सोपे राहिलेले नाही…”- राहुल गांधी (Rahul Gandhi)

0

(San Francisco)सॅन फ्रान्सिस्को: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Former Congress president Rahul Gandhi) यांनी पुन्हा परदेशातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “आता भारतात राजकारण करणे सोपे नाही, मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतात..” असे वक्तव्य राहुल  गांधी यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना (Congress MP Rahul Gandhi in San Francisco ) केले. राहुल गांधी हे दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले.

राहुल गांधी म्हणाले की, “भारतातील राजकारण बदलले आहे. लोकांना धमक्या दिल्या जातात. एजन्सीचा वापर केला जातो. अशा स्थितीत भारतात राजकारण करणे आता सोपे राहिलेले नाही…भारतात असे काही लोक आहेत, ज्यांना वाटते की त्यांना प्रत्येकच गोष्टीबद्धल सर्वकाही माहिती आहे. त्यापैकी एक ( Narendra M0di) मोदी आहेत…ब्रह्मांडात काय चालले आहे, हे ते देवालाही सांगू शकतील…पण मुळात असे आहे की त्यांना काहीही माहिती नसते. तुम्हाला आयुष्यात कशाची माहिती असेल तर आधी ऐकून घ्यावे लागते..भारत जोडो यात्रेत मी हेच शिकलो आहे.. ” अशी टीकाही (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी यावेळी केली.