गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांचीच मात्र निवडणुका जिंकू आम्हीच – दिलीप कुमार सानंदा

0

बुलढाणा BULDHANA : देशामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता ही भाजपाची आहे मात्र खामगाव विधानसभा मतदारसंघात झेंडा हा महाविकास आघाडी व मित्र पक्षाचाच रोबल्या जाईल असा विश्वास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी व्यक्त केला. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प.पू.राष्ट्रसंत भय्यूजी महाराज ट्रस्ट ,महासिद्ध पीठ ऋषी संकुल येथील सभागृहात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले . बुलढाणा जिल्ह्यामध्ये दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत.

28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. यामध्ये खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला आता रंग चढत आहे यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी विरोधकांवर आरोप केले. ज्यांचा बाजार समितीची कुठलाही संबंध नाही अशा ठेकेदारांना उमेदवारी देण्यात आली असा दावा यावेळी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार नानाभाउ कोकरे,वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.