नागपूरः नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना सामना करून नक्षलवाद मोडून काढणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व जवानांना राष्ट्रपतींकडून ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले (President Police Shaurya Medal) )आहे. गणतंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर ही पदके जाहीर करण्यात आली असून राज्यात सर्वाधिक पदके गडचिरोली जिल्ह्यातील जवानांना मिळाली आहेत. पोलिस दलाच्या उत्तम कामगिरीमुळे गडचिरोलीत नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून जिल्ह्याचा बरचसा भाग आता नक्षल कारवायांपासून मुक्त झाला आहे. नक्षलवाद्यांच्या अनेक मोठ्या नेत्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले.या कामगिरीत आपले योगदान देणाऱ्या २९ पोलीस अधिकारी व जवानांना यंदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिस पदकांची यादी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद ग्रामीणचे सध्याचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, अमोल फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बागल, राहुल नामदे, योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव देशमुख, प्रेमकुमार दांडेकर, राहुल आव्हाड, देवाजी कोवासे, पोलीस हवालदार देवेंद्र आत्राम, राजेंद्र मडावी, नांगसू उसेंडी, सुभाष पदा, रामा कोवाची, प्रदीप भासारकर, दिनेश गावडे, एकनाथ सिडाम, प्रकाश नरोटे, शंकर पुंगाटी, गणेश डोहे, सुधाकर कोवाची, नंदेश्वर मडावी, भाउजी मडावी, शिवाजी उसेंडी, गंगाधर कराड, महेश मादेशी, स्वप्नील पदा या जवानांचा समावेश आहे. पदक प्राप्त अधिकारी व जवानांचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी अभिनंदन केले आहे.