गोदरेज ऍग्रोव्हेटतर्फे शाश्वत कापूस उत्पादनासाठी पीवायएनए ब्रँड

0

-शेतकऱ्यांना बनावट उत्पादनांपासून वाचविण्याचा प्रयत्न

नागपूर : गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडच्या (GAVL) क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसने शाश्वत कापूस उत्पादनासाठी आज पीवायएनए हा एकछत्री (अंबरेला) ब्रँड सादर करण्याची घोषणा केली. वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये निवडक कापूस तणनाशकांची संकल्पना रुजविण्यात अग्रणी GAVL पीवायएनए ब्रँड अंतर्गत हिटविड, हिटविड मॅक्स आणि मॅक्सकॉट अशी तीन कापूस तण व्यवस्थापन उत्पादने विकणार आहे.

कापूस पिकाची वाढ सुरुवातीच्या काळात हळूहळू होते. याव्यतिरिक्त, पिकांमधील अंतर जास्त असल्याने, तणांचा कापूस उत्पादनावर ४५-५०% पर्यंत परिणाम होतो. पीवायएनए ब्रँड्स बियाणे पेरणीपासून ते पिकाच्या सक्रिय फुलांच्या अवस्थेपर्यंत तण व्यवस्थापन पर्यायांची विस्तृत प्रमाणात उपलब्ध करून देत असल्याने शेतकरी आता तणमुक्त पीक जास्त काळ मिळवू शकतात. पीवायएनए ब्रँड्स पीक – तण स्पर्धा कमी करतात आणि कापूस पीक सुरुवातीच्या टप्प्यात व्यवस्थित रूजण्यास मदत करतात. त्याचा उत्पादनावर थेट सकारात्मक परिणाम होतो.

पीवायएनए ब्रँड म्हणजे विश्वास आणि गुणवत्ता यांचे प्रतीक आहे. वापरण्यास सोपी आणि सुरक्षित, पीवायएनए ब्रँडची उत्पादने शेतकऱ्यांना तण नियंत्रणाच्या मानवी आणि यांत्रिक पद्धतींवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतात. यासंदर्भात

GAVL चे क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजवेलू एन. के. म्हणाले, “जागतिक स्तरावर, भारतामध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे. तथापि, एकूण कापूस एकरी क्षेत्रापैकी केवळ १०% क्षेत्रच योग्य पद्धतीने हाताळले जात आहे. त्यामुळे केवळ उत्पादकतेवरच नाही तर शेतकऱ्यांच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शाश्वत कापूस उत्पादन सक्षम करण्यासाठी, पीवायएनए ब्रँड अंतर्गत आमची ३ महत्वाची उत्पादने सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”

“शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी दर्जेदार पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही पीवायएनए ब्रँडचा लाभ घेण्यासाठी सह-विपणकांशी भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. यामुळे गोदरेज ब्रँडने गेल्या ३६ वर्षांत शेतकऱ्यांमध्ये कमावलेल्या विश्वासाचा आणि एकत्रितपणे ९०% न वापरलेल्या कापूस एकरी क्षेत्राचा लाभ त्यांना मिळू शकेल,” असेही ते पुढे म्हणाले.

जीएव्हीएल ही २००७ मध्ये पोस्ट-इमर्जंट निवडक कापूस तणनाशक, हिटवीड सादर करणारी पहिली कंपनी होती. जमिनीवर परिणाम न करता कापूस रोपांना मजबूत वाढीसाठी अधिक जागा, प्रकाश आणि हवा मिळण्यासाठी सक्षम करताना पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी (डीएएस) वापरण्यासाठी ते विकसित केले गेले. लवकरच्या पोस्ट-इमर्जंट काळात म्हणजेच ७-१५ डीएएस मध्ये कापसाच्या पिकाच्या संरक्षणाची गरज असते हे लक्षात घेऊन त्यांनी २०१९ मध्ये हिटवीड मॅक्स सादर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ट पीक सुरक्षितता आणि चांगली कार्यक्षमता मिळू शकली. २०२३ मध्ये, कंपनीने मॅक्सकॉट हे ०-३ डीएएस मध्ये वापरता येणारे एक प्री-इमर्जंट तणनाशक सादर केले. हे कापसातील प्रमुख तणांची वाढ दूर करते. त्यामुळे कापसाच्या रोपांची वाढ चांगली होते आणि मोठ्या तणांचा पुढील प्रसार कमी होतो.