नागपूर (Nagpur) 7 नोव्हेंबर :-
व्यंकटेशनगर, खामला निवासी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक त्र्यंबक उपाख्य अण्णाजी भाके यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सहकारनगर घाटावर अन्त्यसंस्कार करण्यात येईल.