(Nagpur )नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप उद्या १ जून रोजी गुरुवारी रेशीमबाग येथे सायंकाळी ६.१५ वाजता होणार आहे. यावर्षी कोल्हापुरातील कणेरी येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Sarsangchalak Dr. Mohan Bhagwat)यांचे प्रमुख भाषण होणार आहे.
नागरिकांनी सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी कृष्णमोहन आणि (Nagpur Mahanagar Sanghchalak Rajesh Loya)नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले आहे. ८ मे रोजी या वर्गाला सुरुवात झाली होती. देशभरातून सुमारे सातशे स्वयंसेवक वर्गात सहभागी झाले आहेत.