बुलढाणा (Buldhana): बुलढाणा जिल्ह्यातील (Shegaon)शेगावच्या (Shri Sant Gajanan Maharaj)श्री संत गजानन महाराजांची पालखी येत्या २६ मे रोजी (Santnagari Shegaon)संतनगरी शेगाव येथून आषाढी निमित्त पंढरपूरकडे पायदळ वारीस प्रस्थान करणार आहे… ही पालखी नागझरी मार्गे अकोला कडे जाईल.
मात्र हा रस्ता अतिशय खराब असून या रस्त्याचे काम करोना काळापासून अद्याप रखडलेले च आहे.हा पालखी मार्ग असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. शेगावच्या संत गजानन महाराजची पालखी ही विदर्भातून सर्वांत मोठी पालखी आहे.पंढरपूर येथील पालखी सोहळ्यातही सर्वात आदर्श तसेच शिस्तबद्ध पालखी म्हणून शेगावचा नावलौकिक आहे.याच पालखी सोहळा तोंडावर आला असताना रस्त्याची सर्व कामे अर्धवट स्थितीतच आहेत.त्यामुळे वारकऱ्यांना यंदाही वाट गिट्टीच्या रस्त्यातून काढावी लागणार आहे.
श्रींच्या च्या पालखी मार्गाकडे प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करतेय का ?, हा प्रश्न आहे. तर अकोला येथून शेकडो भाविक शेगावला दररोज या मार्गाने वारी करतात. त्यांनाही या रस्त्याने जाताना त्रास सहन करावा लागतो.मुख्यमंत्र्यांनी या पालखी मार्गाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे अशी मागणी केल्या जात आहे.