बुलढाणा – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण जागरण यात्रेला सुरुवात केली. आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव धनगर जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष करत आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील धनगर समाजालाही अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटी आरक्षण देण्याची गरज आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यावर डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे. आणि त्यात आमच्या समाजाच्या वतीने संपूर्ण पुरावे न्यायालयाला सादर केले आहे. न्यायालयाचा निकाल हा आमच्याकडून लागेल अशी प्रतिक्रिया आ गोपीचंद पडळकर यांनी बोलून दाखविली.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















