नागपूर- राजकीय क्षेत्रात कुठलेही वक्तव्य गंभीरतेने केले पाहिजे असा सबुरीचा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ नितेश राणे यांना दिला आहे. वडेट्टीवार लवकरच मंत्री असतील असे वक्तव्य त्यांनी केले होते.
यासंदर्भात छेडले असता आता याचा अर्थ नितेश राणे आणि वडेट्टीवार यांनाच विचारला पाहिजे, राजकीय क्षेत्रात वक्तव्य करताना गंभीरतेने करावे, सध्याच्या काळात असे वक्तव्य गंभीरपणे केलं जातं नाही.
वडेट्टीवार कधी कधी म्हणतात सरकार जाणार, त्या वक्तव्यावर उत्तर म्हणून राणे असे बोलले असू शकतात.
अजित पवार समर्थक अजितदादा यांच्या मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत.हितचिंतक अशी मागणी करतात, अशी मागणी करणारे अनेक असतात, पण अजित पवारांबद्दल ते केल्यानं बातमी झाली, एवढंच असेही एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर, मी पूर्ण व्हिडीओ बघितला, त्यांनी नेहमी देवाला जशी प्रार्थना करतात तशी प्रार्थना केली असे सावध उत्तर दिले.
सत्तार यांचे प्रकरणी
सामाजिक कार्यकर्त्यांला मारहाण केली. त्याच्या मित्राने मलाही फोन केला, मारहाण झाल्यावर पोलिसात रिपोर्ट करणे हे कर्तव्य आहे, पोलिसांनी वस्तुस्थिती तपासली पाहिजे असे स्पष्ट केले. अतिवृष्टी, महापूर संदर्भात बोलताना
वनविभागाची भूमिका पूर कमी करण्यासाठी असते. मातीची धूप थांबवणे, पर्यावरण संवर्धन हे वन विभागाच्या भूमिका आहे, वन विभागाच्या जागेवर 1980 च्या कायद्यानुसार प्रोजेक्ट उभे करता येत नाही. बांधकाम करण्यासाठी संबंधित विभाग प्रस्ताव सादर करतील तेव्हा काही असल्यास सत्य समोर येईल असे सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवैधानिक नसल्याने हे सरकार जाणार असल्याचे सांगितले याबत,नाना पटोले यांना सांगा पेढे वाटा, म्हणून हसीन सपने पाहणाऱ्यांच्या स्वप्नात विघ्न कशाला आणायचे असा टोला दिला.
















