कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर, डॉ. बिचुले यांना अखेर अटक

0

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुजित पाटकर यांना ईडीनं बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. थोड्या वेळात त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं.

सुजित पाटकर यांच्यावर मुंबई महापालिकेतील कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होती. अखेर सुजित पाटकर यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यासह आणखी दोघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

 

मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर आणि डॉ. बिचुले यांना अटक केली आहे.

सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे राऊत यांना मोठा धक्का बसल्याचेही सांगितले जात आहे. ईडीने आज सकाळीच सुरज पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्या कोठडीत वाढ मागण्याची शक्यता आहे. महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्यासंदर्भात पाटकर यांना अटक करण्यात आली आहे.

किरीट सोमय्यांचा आरोप

खासदार संजय राऊत यांच्या मित्र परिवाराने 100 कोटीचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजित पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.

नेमके काय आहे प्रकरण?

बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते,असे ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीने केला आहे.

एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे आता एसआयटी देखील अ‍ॅक्शनमोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.