सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

0

तत्परतेने विझविली आग ; उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना


पुणे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत एक मोठा अनर्थ होता होता टळला (major disaster was averted) . त्याचे झाल असे की, पुण्यातील एका कार्यक्रमात (event in Pune ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला (statue of Chhatrapati Shivaji Maharaj) हार अर्पण करताना तिथे असलेल्या समईमुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. वेळीच हा प्रकार लक्षात आला. सुदैवाने ही आग मोठी नव्हती आणि तात्काळ विझविण्यात यश आले. यामुळे अनर्थ टळला. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. पण, तत्परतेने आग विझविण्यात आल्याने साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. आता या घटनेचा व्हीडिओ समाज माध्यमांवरून झपाट्याने व्हायरल होते आहे. त्यावर सूचक प्रतिक्रियाही उमटत आहेत.


पुण्यातील हिंजवडी भागामध्ये एका कराटे कोचिंग क्लासच्या उद्घाटनासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना बोलावण्यात आले होते. सर्व पाहुणे एकत्र आल्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले. यावेळी टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना तिथे ठेवलेल्या दिव्याने सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात त्यांच्या साडीच्या पदराला आग लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सुदैवाने यात सुप्रिया सुळे यांना कुठलीही हानी झाली नाही आणि तात्काळ आग विझविण्यात आली. विशेष म्हणजे या घटनेमुळे सुप्रिया सुळे जराही विचलित झाल्याचे दिसले नाही. त्यांनी धैर्यपूर्वक संपूर्ण परिस्थिती हाताळली. त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संबादही साधला. सुदैवाने आग लागल्याचे वे

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा