पुण्यातील कोयता प्रकरणात तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

0

(PUNE)पुणे : तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचे पुण्यातील प्रकरण गाजत असतानाच आता या प्रकरणात तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळाजवळील पेरूगेट चौकीतील हे तीन कर्मचारी असून त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Police Constable Sunil Shantaram Tathe) पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, (Police Constable Prashant Prakash Jagdale)पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि (Sagar Namdev Rane)सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून या घटनेच्या वेळी हाकेच्या अंतरावरील पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थितीत नव्हता व शहरात फिरणारे बीट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला 20 मिनिटे लावली, असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्यात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर तिच्या मित्राने कोयत्याने हल्ला करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोर तरुणाला रोखले. सदाशिव पेठेतील गर्दीच्या ठिकाणी हा प्रसंग घडल्यावर देखील बराच वेळ पोलिसांचा पत्ता नव्हता, असा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला. त्यानंतर पुणे पोलिसांकडून कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.