Home MAHARASHTRA चर्चा लाडांच्या चार्टर्ड प्लेनची!

चर्चा लाडांच्या चार्टर्ड प्लेनची!

0

 

नागपूर (Nagpur) :- नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी म्हणून पोहोचलेले काही नेते एका खाजगी विमानाने नागपुरात पोहोचल्याची आणि लागलीच डिलीट केलेली चित्रा वाघ यांची एक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेची ठरते आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) उपस्थित राहण्यासाठी नेते, अधिकारी, प्रशासनातील कर्मचारी, पत्रकार मुंबई व राज्याच्या अन्य विविध ठिकाणाहून नागपुरात दाखल होत असतात. स्वाभाविकच त्यासाठी विमानांपासून तर चार चाकी वाहनांपर्यंत, अशा विविध माध्यमांचा वापर होत असतो. पण चित्राताई वाघ यांनी समाज माध्यमावर जाहीर केलेली एक पोस्ट यापेक्षा काहीशी वेगळी ठरली आहे. या हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी म्हणून प्रसाद लाड यांच्या खाजगी चार्टर्ड प्लेन ने आम्ही नागपुरात दाखल झालो, अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर टाकली होती. भाजपाचै गटनेते प्रवीण दरेकर, आमदार सुमीत वानखेडे, नवनाथ बन आदी लोक देखील या खाजगी विमानाने नागपुरात पोहोचल्याची माहिती चित्रा वाघ यांनी विमानातील फोटोंसह टाकली होती. टाकल्याच्या काही वेळानंतर लगेच ही पोस्ट डिलीट देखील करण्यात आली.

पण, एकूणच राजकीय वर्तुळातील मंडळींचा तोरा आणि वागण्याची पद्धत, त्यांना उपलब्ध होणाऱ्या सोयी, सुविधा, राजकारणाशी, विशेषतः सत्तेशी निगडित लोकांच्या बदलत्या रीती याचीही चर्चा यानिमित्ताने होताना दिसते आहे. ही पोस्ट लागलीच काढून टाकण्याची गरज चित्राताईंना का वाटली असेल, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहेच!