नवी दिल्ली :NEW Delhi मणिपूरमधील घटना कोणत्याही समाजासाठी अत्यंत लज्जास्पद असून अशा घटनांमुळे मन संतप्त होते. यामुळे देशाचे नाव बदनाम होत आहे. दोषींपैकी एकालाही सोडले जाणार नाही, त्यांना कठोर शिक्षा होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेत पोहोचल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना (PM Narendra Modi on Manipur Incidence ) दिली. मणिपूरमधील घटनेचा तीव्र निषेध करुन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन यांना त्यांच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणखी कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळी अधिवेशनाचा उपयोग जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. संसदेत प्रत्येक कायद्यावर सविस्तर चर्चा करणे, लोकांच्या हिताचे मुद्दे मांडणे, ही संसदेतील प्रत्येक खासदाराची जबाबदारी आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.The incident in Manipur is very shameful for any society and such incidents make the mind angry