नवरात्रनिमित्त बाजार सजला

0

 

नागपूर NAGPUR – आजपासून NAVRATRI UTSAV  नवरात्र उत्सवाला प्रारंभ व देवीची घटस्थापना होणार असल्याने शहरातील कोराडी, पारडी, आग्याराम,विश्वकर्मा नगरातील भवानी यासह विविध देवी मंदिरात भक्तांची गर्दी झाली आहे. आज पहिलाच दिवस रविवारची सुटी असल्याने यात अधिक भर पडली.घटस्थापनेसाठी लागणारी विविध साहित्यांची दुकाने महाल,इतवारी,सक्करदरा, खामला लक्ष्मीनगरात थाटलेली असून हे साहित्य घेण्यासाठी काल रात्री व आज सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केलेली आहे. यावेळेस घटस्थापने साठी लागणारे साहित्याचे दुकानांत वाढ झाल्याने जे ग्राहक इतर दुकानांवर साहित्य घेण्यासाठी विभागले गेल्याने त्याचा परिणाम कायमस्वरूपी साहित्य विक्री करणारे दुकानदारांवर दिसला. अनेकजण दसरा,दिवाळी अशी खरेदी पण करताना दिसले.