पक्षाची भूमिका, पक्षाची वैचारिक मांडणी, पक्षाची एखाद्या धोरणावरची भूमिका, एखाद्या घटनेवरचे भाष्य करण्यासाठी प्रवक्त्यांची नेमणूक केली जाते. मात्र केवळ पक्षाचीच भूमिका नाही तर जनतेची भूमिका जेंव्हा एखादा प्रवक्ता मांडायला लागतो, व ही सामान्य जनतेची भूमिका जेव्हा प्रवक्ता जमिनीवरून पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवायला लागतो म्हणजेच जेव्हा जनतेचा आवाज पक्षापर्यंत पोहोचण्याचही काम जेंव्हा प्रवक्ता करायला लागतो मग तो केवळ प्रवक्ता राहत नाही तो लोकप्रवक्ता होतो.
प्रवक्ता ते लोकप्रवक्ता हा शिवरायजी कुलकर्णी यांचा प्रवास व्हाया स्वयंसेवक, अभ्यासू पत्रकार, हिंदू, हिंदुत्व, सामाजिक समरसता समता, या विषयातला पुढाकार घेणारा संवेदनशील कार्यकर्ता, संगीत साहित्य, नाटक, चित्रपट व सांस्कृतिक चळवळ या क्षेत्रांना समर्पित भावनेने न्याय देणारा सृजनात्मक व्यक्तिमत्व अशा विविध क्षेत्रातून झाला असल्याने व या क्षेत्रातील घटना, व्यक्तिमत्व , या व्यक्तिमत्त्वांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या बाबतीतल्या सुखदुःखाचे प्रसंग याची खूप अचूक व उत्तम माहिती यामुळे त्यांचे प्रवक्ते पद हे जिवंत व हृदयाला भिडणारे व कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याला सामाजिक कार्यकर्त्याला विचार करण्यास भाग पडणारे बनते.
लोकप्रवक्ता ही व्यापक भूमिका असते. पक्षाने दिलेले काम, पक्षाने स्वीकारलेली भूमिका व धोरण, सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक यासारख्या अनेकक्षेत्रातील एखाद्या घटनेवरचं वरची प्रतिक्रिया वर्तमानपत्र टीव्ही चॅनल्स मुलाखतीद्वारे मांडणी हे तर खूप आवश्यक व सामान्य स्थितीतील प्रवक्त्याला दिलेलं काम आहे. मात्र शिवराय जी हे मुळात हाडाचे कार्यकर्ते असल्याने तसेच अनेक वर्ष पत्रकार राहून चुकल्याने व संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते असल्याने ते महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि आपल्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून एखादी घटना एखादा प्रसंग, विरोधी पक्षाची एखादी प्रतिक्रिया व त्यातील राजकारण नेमकं फिरून ते विरोधकांवर उलटवून त्या मुद्द्यांचा उपयोग भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी जमेची बाजू कशी बनवायची यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न जमिनी स्तरावरून करताना दिसतात.
कोरोना काळात लसींचा कृत्रिम तुटवडा असो की रेएमडीसीवर इंजेक्शनच्या काळाबाजार असो लव जिहाद च्या वेगवेगळ्या प्रकरणांना समाजासमोर न्यायव्यवस्थेसमोर तसेच धार्मिक अंगाने विचार करणाऱ्या नेत्यांसमोर उजागर करून त्यातील बारीक बारीक मांडणी करणे असो करणे असो, उमेश कोल्हे प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून येणाऱ्या या प्रकरणात NIA ला लक्ष घालण्यास बाध्य करण्यासाठीची दमदार भूमिका दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत मांडणी असो या सर्व घटनांच्या शृंखलेत शिवरायजी केवळ वरवर काम करत नाही तर मुळाशी जाऊन संपूर्ण जबाबदारी स्वीकारून, प्रसंगी जीवाला धोका होणार आहे माहीत असूनही अशा परिणामांची पर्वा न करता समस्यांना मिळण्याचे धाडस दाखवतात.
आणि या त्यांच्या अशा खोज पत्रकारिते सारख्या गुणांमुळे त्यांचं प्रवक्ता पण हे केवळ प्रवक्ता पद न राहता नेत्यांमध्ये परावर्तित कन्वर्ट झालेल आपल्याला दिसून येते. अशा घेतल्या गेलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या मूळ प्रवक्ता या जबाबदारीला एक मोठी उंची, झळाळी व उत्तम असा लौकिक प्राप्त होतो आणि हा लौकिक त्यांच्या परिश्रमातून, घामातून रक्त आटवून येत असल्याने त्याचा परिणाम, त्याचा धसका, त्याचा लोहा मानण्याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांना पक्षातील निर्णय येणाऱ्या व्यक्तींना पर्याय उरत नाही. याचमुळे त्यांनी उचललेल्या मुद्द्यांची परिणामकारकता इतर घटकांपेक्षा खूप वेगळी असते.
शिवराय जी प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी निभावत असताना थेट जमिनीवरून प्रत्यक्ष उपस्थित राहून व प्रत्यक्ष त्या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन बोलत असल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला एक ऑथेंटिसिटी प्राप्त झाली आहे, अधिकारीता प्राप्त झाली आहे आणि अशा ऑथेंटिसिटीमुळे मुळे महाराष्ट्रातील पत्रकार व राजकीय क्षेत्रात त्यांची विश्वसनीयता ही अलीकडच्या काळात कमालीची वाढली आहे.
त्यांचे सहकारी म्हणून काम करणारे मुख्य प्रवक्ते श्री केशव उपाध्ये व सहमुख्यप्रवक्ते विश्वासजी पाठक, अनुभवी व प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्काची मोठी सांभाळणारे अवधूत जी वाघ व त्यांच्या सहकारी श्वेता शालिनी यांच्याशी त्यांचा उत्तम असलेला संवाद आणि त्या संवादातून मोठ्या प्रमाणावर त्यांनी जी एक विश्वसनीयता निर्माण केली ती आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालय व अन्य महत्वाच्या ठिकाणी अनुभवायला मिळते
मित्रांसाठी, सहकाऱ्यासाठी, नेत्यांसाठी शिवरायजी एक चांगले मित्र आहेत. या मित्रांसाठी त्यांची जनसंपर्काची यादी नेहमीच वापरण्यासाठी खुली असते कुणी कितीही अडचणीत येऊ द्या त्या अडचणीचे स्वरूप कितीही गंभीर असो ते त्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभे राहतात. समाज जीवनातल्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये मग ते राजकारण असो समाजकारण असो, शिक्षण असो, व्यापार असो अर्थ जगत असो, उद्योग असो, संगीत असो, सांस्कृतिक असो, वा सेवा असो यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची असलेली पोहोच व्याप्ती त्यांच्या प्रवक्ते पदाला धारदार असे इनपुट पुरवण्यात उपयोगी ठरते.
भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची प्रवक्ता पदी केलेली पुनर्नियुक्ती ही खूप महत्त्वाची मानली पाहिजे कारण अध्यक्षांना नवी टीम बनवण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि त्यांच्याही टीम मध्ये शिवराय कुलकर्णींचा स्थान अबाधित राहणं ही एका अर्थाने शिवरायजीं च्या सातत्याने पक्षासाठी समाजासाठी व कार्यकर्ते नेत्यांसाठी उत्तम माहिती व संदर्भ पुरवण्याच्या तसेच जनतेला व कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या अधिक साक्षर करण्यासाठी केलेल्या परिश्रम प्रयत्नातला मिळालेली ही पावती आहे.
प्रवक्ता ते लोकप्रवक्ता हा प्रवास इथेच थांबणारा नसून मला आणि आपणा सर्वांना खात्री आहे की हा प्रवास लोकनेत्यांमध्ये रूपांतरित होऊन एक उत्तम लोकनेते म्हणून त्यांची झालेली सुरुवात अजून वेगाने प्रबळ व समर्थपणे वाटचाल करेल. शिवराय कुलकर्णी उत्तम मूर्तिकार पण आहेत मूर्ती घडताना जशी एक एकाग्रता लागते त्याच एकाग्रतेने ते समाज जीवनातल्या वेगवेगळ्या समस्यांना उत्तर देण्यासाठी धडपड करत असतात.
हा प्रवासात त्यांची ठाकूरकी सई वहिनी, मुलगी गार्गी, मुलगा शंभू यांच्या समर्थ साथी मुळे, भक्कम पाठिंब्यामुळे आहे व त्यामुळेच राजकीय, कौटुंबिक व सामाजिक क्षेत्रातील स्थान मजबूत होण्यास उत्तम मदत होणार आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. हे कुलकर्णी कुटुंब सर्वार्थाने परिपूर्ण कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये संगीत, साहित्य, राजकारण, समाजकारण सेवा, इतरांसाठी धावून जाण्याची वृत्ती प्रत्येक कुटुंब सदस्यात आहे आणि हे संस्कार माननीय दादा भास्करराव कुलकर्णी व त्यांच्या स्व. मातोश्री, त्यांची भगिनी ललिता या सर्वांकडून प्रवाहित होत आहे.
ब्रेव्हो बंधू ब्रेव्हो लीडर शिवराय जी मनःपूर्वक अभिनंदन !!
– प्रा. दिनेश सूर्यवंशी
सदस्य, भाजपा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
*पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra*