…त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार; अखेर पोस्टरवर पटोले बोलले

0

नागपूर, 4 जून : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनरवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर आता खुद्द पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्ते उत्साही असतात असे बॅनर लावतात. मात्र मी वाढदिवसाचे होर्डिंग्ज न लावता विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गरजूंना मदत करण्यास सांगितलं होतं, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

पटोले यांनी नेमंक काय म्हटलं? 

कार्यकर्ते उत्साही असतात असे बॅनर लावतात. मात्र मी वाढदिवसाचे होर्डिंग्ज न लावता विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गरजूंना मदत करण्यास सांगितलं होतं. ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री होतो. काँग्रेसमध्ये हायकमांडकडून  निर्णय घेतला जातो. आधी जास्त आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्री कोण याचा निर्णय हायकमांड घेईल. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. मविआच्या बैठकीत हा आढावा सादर करण्यात येणार असल्याचंही पटोले यांनी म्हटलं.