Home Artical Blog पश्चिम बंगालचा विजय देशाच्या प्रगती, स्थैर्य आणि उज्ज्वल भविष्याचा संकेत – आ....

पश्चिम बंगालचा विजय देशाच्या प्रगती, स्थैर्य आणि उज्ज्वल भविष्याचा संकेत – आ. किशोर जोरगेवार

0

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा ऐतिहासिक विजय देशाच्या राजकारणातील एक नवा पर्व सुरू करणारा ठरला आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमानंतर मिळालेला हा जनादेश म्हणजे परिवर्तनाची स्पष्ट चाहूल आहे. हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी, ठाम आणि विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेला अढळ विश्वास आहे. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या त्यांच्या धोरणाला देशभरातून मिळणारा प्रतिसाद आज अधिक दृढ होताना दिसत आहे.
आसाम आणि पुडुचेरीमध्येही भारतीय जनता पक्षाने केलेली उल्लेखनीय कामगिरी ही केवळ निवडणुकीतील यश नसून, जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणार्या सुशासनाची पावती आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या विविध जनकल्याणकारी योजना, गरीब आणि वंचित घटकांसाठी घेतलेले निर्णय, तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे जनतेचा विश्वास अधिकच मजबुत झाला आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाला नवे आयाम मिळत आहेत. पायाभूत सुविधांपासून ते गुंतवणुकीपर्यंत, तसेच कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनात पारदर्शकता राखण्याच्या बाबतीत त्यांनी निर्माण केलेला आदर्श इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. या ऐतिहासिक विजयानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन.
हा विजय केवळ एका राजकीय पक्षाचा नसून, देशाच्या प्रगतीचा, स्थैर्याचा आणि उज्ज्वल भविष्याचा द्योतक आहे. नव्या युगाची ही भक्कम सुरुवात असून, आगामी काळात भारत अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि समृद्ध राष्ट्र म्हणून जगात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.