अमरावती- संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले, साईबाबांचा अपमान केला आहे. जे अफजल खानचे वकील होते, श्रीकृष्ण कुलकर्णी त्यांचा हा वंशज संभाजी भिडे आहे. राज्य पोलीस संभाजी भिडे यांच्या सभेला साथ देथ आहेत. त्यांना अटक करत नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा कट आहे का? त्यांना दोन समाजामध्ये भांडण लावायचे आहे का? हे असं झालं तर जनता माफ करणार नाही. देशाचे वातावरण खराब करण्याचे काम चालू आहे. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी काँग्रेस नेत्या आ. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.