मालवाहू वाहनाला एकाकी गाठले : यवतमाळ मार्गावरील घटना
नांदगाव खंडेश्वर. यवतमाळ (Yavatmal ) येथून किराणा मालाची उधारी वसुल केल्यानंतर चालक मालवाहू वाहनातून ही रक्कम घेऊन अमरावतीकडे (Amravati ) निघाला. वाटेत अनोळखी कारने लांबवर या वाहनाचा पाठलाग (car chase ensued ) केला. चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण, निर्जन ठिकाणी एकाकी गाठून वानह थांबविण्यास भाग पाडले. पाठलाग करणाऱ्या कारमधून काही आरोपी हातात शस्त्र घेऊन उतरले. मालवाहू वानहचालकाला शस्त्राचा धाक दाखवत साडेतेरा लाखांची रोख आपल्या ताब्यात घेतली आणि आलेल्या वाहतान बसून पळून गेले. वाटमारीची ही घटना धानोरानजीक (Dhanora) घडली. घटनेनंतर चालकाने प्रथक मालकाला व नंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसानी गुन्हा दाखल करीत लुटारूंचा शोध सुरू केला आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून परिसरातील गावांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील लकडगंजमधील इम्रान बेग गफ्फार बेग (३८) हा मालवाहू चारचाकीने अमरावतीकडे येत होता. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या कारने नांदगाव खंडेश्वर ते धानोरा गुरव मार्गाने त्याच्या वाहनाचा पाठलाग केला आणि गाठल्यानंतर कार आडवी लावली. त्यामधून उतरलेल्या चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी तलवार व चाकूचा धाक दाखवत डिक्कीत ठेवलेली ही रक्कम चालकाकडून हिसकावून घेतली.
अमरावतीच्या व्यावसायिकाची रक्कम
अमरावती येथील ड्रायफ्रूट व्यावसायिकाच्या किराणा मालाची ही रक्कम असल्याची माहिती पुढे येत आहे. घटनेनंतर आरोपीने प्रथम व्यावसायिकालाच माहिती दिली. त्यांच्या सांगण्यावरून पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या घटनेबाबात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. आरोपींना वाहनातून मोठी रक्कम नेली जात असल्याची पुरेपूर माहिती असावी म्हणूनच कारमधून लांबवर पाठलाग केला असावा, असा कयास लावला जात आहे. याप्रकरणी चालक इम्रान बेग याच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी पहाटे ४ च्या सुमारास गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पोळकर पुढील तपास करीत आहेत.