ही परिवर्तनाची सुरुवात -पटोले, आत्मचिंतन करणार-बावनकुळे

0

नागपूर: कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर 11 हजारावर मतांनी विजयी झाल्याने मविआत राज्यभर जल्लोष सुरू आहे. पिंपरी चिंचवडची जागा भाजपच्या आश्विनी जगताप यांनी कायम ठेवली आहे. या ठिकाणी मविआला बंडखोरीचा फटका बसल्याचे पहायला मिळाले. गेली २८ वर्ष कसबा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपानी चांगलीच गाजली
दरम्यान,तामिळनाडू व पश्चिम बंगाल,त्रिपुरा आणि नागालँड निव़डणुकीतही काँग्रेसला विजय मिळाला.आजच्या पोटनिवडणूक निकालाचा कल पाहता ही परिवर्तनाची सुरुवात असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दुसरीकडे परंपरागत कसबा मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत विजयाची आशा असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल स्वीकारत आत्मचिंतन करण्याची तयारी दर्शविली आहे.