नागपूरः दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणेचे जोरदार समर्थन करताना पांढरा पैसा बाळगणाऱ्यांना या निर्णयाची कोणतीही भीती नसल्याचे मत उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis on RBI Decision) यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टिकेची झोड उठविली असताना फडणवीस यांनी त्यामागील भूमिका स्पष्ट केली. दोन हजार रुपयांची नोट अजूनही कायदेशीर असून ती बेकायदेशीर ठरवण्यात आली नसल्याचे स्पष्ट करून फडणवीस म्हणालेकी, रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेबरची मुदत दिली आहे. कायदेशीर नोटा असणाऱ्यांना तसेच पांढरा पैसा असणाऱ्यांना या निर्णयामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. पण कुणी काळा पैसा जमा करून ठेवला असेल, तर त्याला मात्र तो बदलताना त्रास निश्चितच होणार आहे. त्याला एवढा पैसा कुठून आला? हे स्पष्ट करावे लागेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पाकिस्तानच्या आयएसआयकडून नेहमीच बनावट चलन आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचा हा प्रयत्न अशा निर्णयांमुळे हाणून पाडला जातो. त्यामुळे नोटा जमा करू