Home political उदय सामंतांचा भाऊ ठाकरे गटात जाणार?

उदय सामंतांचा भाऊ ठाकरे गटात जाणार?

0

रत्नागिरी: उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे ठाकरे गटात दाखल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. अलिकडेच भैय्या सामंत यांनी आपल्या डीपीला ठाकरे गटाचे मशाल ठेवले. मात्र, त्यावरुन चर्चा झाल्यावर त्यांनी ते बदलले. त्यामुळे ते ठाकरे गटात जाण्याचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण उर्फ भैया सामंत यांचे नाव शिवसेनेकडून घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघात भाजपच निवडणूक लढवेल, असे स्पष्टच सांगितले. त्यातून वाद सुरु झाला व ‘करारा जबाब मीलेगा’, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे आता किरण सामंत यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.