*आमगाव येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची महायुती उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ भव्य सभा*

0

आमगाव : आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सभा आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती सभेचे आकर्षण ठरली.सभेला मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या कार्यकर्ते आणि जनतेच्या उत्साहामुळे मैदान गजबजून गेले होते. नितिन गडकरी यांनी आपल्या भाषणात गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि युवकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.

गडकरी यांनी सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा उल्लेख करत सांगितले की, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात धानाच्या तनिसा मधून सीएनजी तयार करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाच्या काडापासून अतिरिक्त उत्पन्न मिळेल, तर दुसरीकडे पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापरालाही चालना मिळेल. हे प्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक स्थितीला उभारी देणारे ठरतील, असे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी महाराष्ट्रातील रस्ते विकासावर भाष्य करत पुढील पाच वर्षांत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले. यातून केवळ उद्योग-व्यवसायच नाही तर पर्यटन आणि रोजगाराच्या संधींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांचा उल्लेख करत गडकरी यांनी त्यांना कर्तबगार, प्रामाणिक, आणि लोकहिताच्या कामात नेहमी आघाडीवर असणारा उमेदवार म्हणून गौरवले. त्यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की, संजय पुराम यांच्या विजयामुळे मतदारसंघाचा विकास वेगाने होईल, तसेच स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असेल.प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या भाषणात महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिंब्याची महत्त्वता स्पष्ट केली. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाचे नवे दार उघडले जात असल्याचे सांगितले. “संजय पुराम यांच्या रूपाने मतदारसंघाला एक खंबीर, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेता मिळणार आहे,” असे पटेल म्हणाले.या भव्य सभेला गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विविध गावांतील कार्यकर्ते, स्थानिक नेते, शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर विकासाच्या संधींबद्दल आणि बदलाच्या आशेचा भाव स्पष्ट दिसत होता.