
“असु आम्ही सुखाने पत्थर पायातील”-भय्याजी दाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित व्हिडिओचे लोकार्पण
नागपूर ४ डिसेंबर २०१५ : गृहस्थी संघ प्रचारक मा. भय्याजी दाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित व्हिडिओचे लोकार्पण, मा. श्री.दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब ताम्हण (शतायुषी ज्येष्ठ स्वयंसेवक) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मश्री डाॅ. विलास डांगरे भूषविणार आहेत. या प्रसंगी मा.श्री. श्रीधरजी गाडगे मार्गदर्शन करणार असून मा. श्री. राजेशजी अवचट,मा. श्री. संजयजी दाणी आणि प्रा. श्री.रवींद्रजी भुसारी(ज्येष्ठ संघ प्रचारक) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम संस्कृती सेलेब्रेशन सभागृह, पहिला मजला, तरुण भारत कार्यालय, रामदासपेठ, नागपूर येथे
शनिवार, ६ डिसेंबर २०२५
दुपारी ४ वाजता सुनिश्चित करण्यात आला आहे.
तरी संघ विचारावर निस्सिम प्रेम करणाऱ्या समस्त नागरिकांनी या अभिनव कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रामदासपेठ शाखा, दैनिक तरुणभारत, दाणी परिवार तसेच मिलिंद रहाटगांवकर प्रयत्नरत आहेत.

संक्षिप्त परिचय
भैयाजी दाणी (प्रभाकर बळवंत दाणी) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख आणि पहिले गृहस्थ प्रचारक होते. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९०७ रोजी नागपूरमधील उमरेड येथील श्रीमंत कुटुंबात झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामान्यतः अविवाहित प्रचारकांची परंपरा आहे, परंतु भैयाजी दाणी यांनी कौटुंबिक जीवन जगताना संघाचे प्रचारक म्हणून काम केले. काशीमध्ये शिक्षण घेत असताना श्री गुरुजींच्या (सरसंघचालक माधव सदाशिव गोलवलकर) संपर्कात आले व त्यांच्या प्रेरणेमुळेच गुरुजी संघात आले. आदरणीय भय्याजींनी आरएसएस,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ यासारख्या अनेक संघटनांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. भय्याजींनी १२ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह ही जबाबदारी समर्थरित्या निभावली व संघाच्या प्रचार प्रसार कार्यात मोलाची भर टाकली. त्यांच्या भरीव संघकार्यावर विपुल लेखन झाले असून, त्यांच्या जीवनकथेवरही अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.





















