संभाजी भिडे यांच्या विरोधात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक

0

मुंबई- शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सभेला नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीसह डॅा. बाबासाहेबांच्या अनुयायांनी प्रखर विरोध केला आहे.हॉलच्या बाहेर वंचित बहुजन आघाडी आणि डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने जमा झाले, व त्यांनी काळे झेंडे दाखवत संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर बसून विरोध केला.देश विरोधी आणि स्वातंत्र्याविषयी बेताल वक्तव्य केल्याचे आरोप करत वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरात आक्रमक झाले असल्याचे दिसून येते आहे. नवी मुंबईतील कोपर खैरणे मधील सभेला तसाच विरोध पाहायला मिळाला,यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना समजाऊन सभा स्थळावरून जाण्यास विनंती केली. त्यामुळे सर्व कार्यकर्ते निघून गेले,व संभाजी भिडे यांची सभा बंदिस्त हॉल मध्ये सुरू आहे. आत कुणालाही प्रवेश दिला जात नाही. पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे, मात्र काही काळ वातावरण तंग झाल्याचे पाहायला मिळाले.